Friday, October 31, 2008

गडसंवर्धन गीत

चला मिळुनी सारे जाऊ गडकोटांचा विकास व संवर्धन करु // ध्र // अनोखे सीमोल्लंघन आहे गडाला दस~याचा मुहूर्त घेऊनी चला रोहिडाला शिवशाहीर, इतिहास अभ्यासक आहे सांगाती वाट पहता कशाची चला दुर्गसंवर्धनाती // 1 // चला मिळुनी . . . . . गडप्रेमी निसर्गप्रेमी व स्वंयसेवी संस्थामध्ये सामिल होउन पुर्ण करु दुर्गसंवर्धनाचे टप्पे पुरातत्व खात्याची उदासिनता कामासठी पाठपुरावा करु म्हणता // 2 // चला मिळुनी . . . . . हनुमंत चौंडकर: 09881907177

किल्ले संवर्धन ही काळाची गरज

समाजातील किल्ले संवर्धनाचा आराखडा तयार ही बातमी वाचुन सर्व गडप्रेमी व निसर्गप्रेमी यांना आनंदच झाला असेल याबद्दल कोणाचेही दुमत नाही असे मला जाणवते.
किल्ले संवधन मोहीमेमध्ये स्थानिक नागरिंकाबरोबरच गडप्रेमी व पर्यटक यांचा सहभाग हा महत्वाचा माणला जाणार आहे, कारण गड, किल्ले, ही, महाराष्ट्रातील शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेचे प्रमुख अंग माणले जाते.
गडावर स्वच्छता अभियान, श्रमदान व जनजाग्रुती अभियान इ. कार्यक्रमाद्वारे पुणे येथील वीविध संस्था आयोजन करत असतात यामध्ये प्रामुख्याणे श्री सिध्देश्वर ट्रेकिंग क्लब, रायरेश्वर प्रतिष्ठान, गिरिदर्शन ट्रेकिंग क्लब इ. चे नाव प्रकर्षाने आठवते.
प्रेरणादायी इतिहासाची ग्वाही देणा~या गड कोटांची आज जी दयनीय अवस्था आहे याच उदासिनतेतुन पुण्यातील चंद्रशेखर शेळके, सागर पालकर व पंडीत अतिवाडकर अशा विविध गडप्रेमिंनी पुढाकार घेउन गडकोटांचा विकास आराखडा तयार करुण दस~याच्या मुहूर्तावर विविध टप्प्यामध्ये मोहिमेस प्रारंभ होणार असुन या कामास गडप्रेमी, निसर्गप्रेमी व स्थानिक नागरिकांनी जास्तीत जास्त मोठ्या संख्खेने सहभागी होण्याचे आम्ही आवाहन करत आहोत.

किल्ल्याचे संवर्धन व विकास घडवुन आणत असताना काही मद्दे आपणास सांगावेसे वाटतात कारण प्रत्येक ऐतिहासिक किल्ला, गड हा त्याच्या वेगळेपणा व वैशिष्ट्यानुसार दिमाखात दिसत असतो. दिशादर्शक फलकामुळे पर्यटन स्थळ होउन स्थानिक युवकांना व्यवसायाचा पर्याय उपलब्ध होउ शकेल. रस्तादर्शक व दिशादर्शक फलक वाचत गड चढण्यात जो आनंद मिळतो त्याच्या कितीतरी पटीने जास्त आनंद हा रस्ता हरवण्यात मिळत असतो.
पुरातत्व खाते व राज्य शासन यांच्यातील समन्वयाअभावी विविध गड, किल्ले व पर्यटन स्थ्ळांच्या ठिकाणी दुर्गसंवर्धनाचे काम होउ शकले नाही. या ऐतिहासिक स्थळांच्या संवर्धनाची जबाबदारीचा भार दुर्गप्रेमींनी खारीचा वाटा समजुन उचलायला हवा यामध्ये गडावरील पाण्याच्या टाक्या गाळामुळे खराब पाण्याने वाहत असुन त्यामुळे या ठिकाणी पाण्याचे दुर्भिक्ष्य आढळते, माच्यांची डागडुजी तसेच प्रतपगडावर अफजल भुरुंज डागडुजी चालु आहे हे एक भुषणावह आहे ते सर्व किल्ल्यावर गडाचे सौंदर्य अभादित राहुन होइल अशी अपेक्षा व्यक्त करतो.
स्थानिक तरुणांना यामुळे वेगवेगळ्या प्रकारचा रोजगार उपलब्ध होणार आहे यामध्ये प्रामुख्याने मार्गदर्शक म्हणुन गडाचा इतिहास पोवाडे गावुन सर्वांपुढे मांढणे, गडाच्या पायथ्याशी पर्यटकासाठी व गडप्रेमीसाठी राहण्याच्या व जेवणाच्या सुविधा उपलब्ध करुन देणे. यामध्ये एक गोष्ट प्रामुख्याने सांगावीशी वाटते ती म्हणजे कोणताही गड हा सिंहगड होउ नये म्हणजे गडावर होटेल, ढाबे यांचे अस्तित्व ठेउ नये.
गड किल्ले इ. ठिकाणी आक्टोबर ते जानेवारी पर्यंत गडावर मोठ्या प्रमाणात गवत वाढत असते या गवत कापण्याला जर स्थानिक नागरिकांना पुरातत्व विभाग व वनविभाग यांनी परवानगी दिली तर उन्हाळ्यामध्ये दुष्काळाचे जे चित्र दिसते ते कमी होण्यास मदतच होईल. कारण हे गवत राज्य शासनाकडुन चलविल्या जाणा~या जणावरांच्या छावण्यासाठीसुध्दा उपयोगी पडु शकते.
या अशाच विवीध मुद्द्यावरुन किल्ले संवर्धन ही काळाची गरजच आहे असे आपणा सर्वांच्या वतीने सांगावेसे वाटते व पुढील सर्व मोहीमामध्ये सहभागी होउन या कामास हातभार लावण्यास पुढे येउया अशी ग्वाही देउया.

जय भवानी जय शिवाजी

DIWALI 2008 GEET

"DIWALI GEET"

Aayaa Tyohaar Diwali Ka

Aayaa tyohaar Diwali ka

Bachcho ki khushhali ka

Bablu kahate papa se

Mujhako PC lana haiguriya kahati mammi se

hame sitar bajana hai

papa bare achambhe me hai

ye mausam kangali ka

Aayaa tyohaar diwali ka

Bibi kahati pati dev se

Jab bonus tum paayoge

Sabse pahale haar sunahara

La mujhako pahnaao ge

Pati dev to mook bane hai

Rupaya denaa udhaari ka

Aayaa tyohaar diwali ka

Sab ki farmaish se tang huye hai

Bablu guriya ke papa ji

Patni to sir chadh kar bole

Kabhi na kahati aao ji

Ab bhaag na sakate papa ji

Jo theka liye rakhwali ka

Aayaa tyohaar diwali ka

HANUMANT CHAUNDKAR

Saturday, October 4, 2008

सामाजिक बांधिलकीशी परिचय :

१। संस्थापक : श्री सिद्धेश्वर ट्रेकिंग क्लब, पुणे

२। सदस्य : पोलिस मित्र संघ, महाराष्ट्र राज्य

३। कायम सभासदत्व: यूथ होस्टेल असोसिअशन ऑफ़ इंडिया, दिल्ली

४। सचिव : सिद्धेश्वर युवा मंच नायगांव

माणसे

जी माणसे हवीशी वाटतातती कधी भेटत नाहीजी माणसे नकोशी वाटतातत्यांचा सहवास संपत नाहीज्यांच्याकडे जावेशे वाटतेत्यांच्याकडे जायला जमत नाहीज्यांच्याकडे जाऊ नये असे वाटतेत्यांच्याकडे जावेच लागतेजेंव्हा जीवन नकोसे वाटतेतेंव्हा काळ संपत नाहीजीवनामध्ये सुरुवातीस ज्यात अथ नाही असे वाटते,त्यातच खूप अथ भरलेला आहे असे आयुष्याच्या शेवटी कळतेजेंव्हा जीवनाचा खरा अथ कळतोतेंव्हा काळ संपलेला असतोनशीब हे असच असतेत्याच्याशी जरा जपून वागाव लागततिथे कोणाचेच चालत नाहीजिकडे नेईल तिकडे जावेच लागत ....